भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे

sarpa bhulon guntala nada | garudiyen phandan ghatalase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणोनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण सायासे नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्वा नास जालीं बाळें ॥३॥ गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥