भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं

saralen atan nahin | na mhane velakal kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥ सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाहीं राग ॥२॥ भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥३॥