भजनी मालिका
← भजनांकडे परत

समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि

samagamen ase hari nenatiyan | nedi jaun vanyan ankitansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥ सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥ सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥ त्यां जाला निर्धार हरी आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥ निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥ नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥