भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला

sarvapakshin hari sahesakha jala | olya anganichya kalpalata tyala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥