भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥१॥ तार्किकाचे अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपेरें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥१॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥ त्याचा वेध लागला छंद हरी गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥ धारीष्ट धैर्याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तवत्ते समर्पिलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पीलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्यां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम