भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा

vesha nahin bol avaguna dushile | aisha bola bhale jhanin kshobha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥१॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥ याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें हीत ॥३॥ तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥