भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया

vairagyacha angin jhalase sanchar | ichchhi vanantar sevavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥ नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥ तुका म्हणे झालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥