भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते

vesh vandaya purate | kon bramhan nirute

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥ असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥ तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥