भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे

vaidya ek pandharirav | antarbhav to jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥ रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥ नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥ तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥