भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया

vaishnav to jaya | avaghi devavari maya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥ तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥