भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे

vedavihit tumhi aika ho karmen | bolaton tin varmen santampudhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नी एक ॥३॥ तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥४॥