भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥१॥ त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक मज कांहीं नावडती मात । एक पंढरिनाथवांचुनिया ॥१॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥ तूं वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामीं ॥१॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां आम्हां हें चि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥ केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम