भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं

anik myan kona yaven kakulati | kon kama yeti antakalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥ तूं वो माझी सखी येसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥ काया वाचा मनें हें चि आस करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥ तुका म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रम्हरस भोजन हें ॥३॥