भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी

anuniyan mana | avaghya dhandolilya khuna | dekhila to rana | pandharapuranivasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥ तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥ तुका म्हणे खळ । होती क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥