भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी

atan ughadin dole | jari adyapi na kale | tari matechiye khole | dagad ala potasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥