भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीके काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं

anike kay thodin | pari ten phar khotin kudin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीके काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥ सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥ सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥ तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥