भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक मज कांहीं नावडती मात । एक पंढरिनाथवांचुनिया

anik maj kanhin navadati mat | ek pandharinathavanchuniya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक मज कांहीं नावडती मात । एक पंढरिनाथवांचुनिया ॥१॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥ तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥