भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी

anik naka karun cheshta | vhal kashta varapadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥ सुखें करा हरीकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥ तुका म्हणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥