भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंत हरी बाहेर हरी । हरीनें घरीं कोंडिलें

ant hari baher hari | harinen gharin kondilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आंत हरी बाहेर हरी । हरीनें घरीं कोंडिलें ॥१॥ हरीनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥ हरीने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरी भोवे भोंवताला ॥३॥