भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे

anik ya kalen na chale upay | dharave te pay vithobache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक या काळें न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥ अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥ तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥