पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि
paraviya nari rakhumaisaman | hen gelen nemun thayinchen chi
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
paraviya nari rakhumaisaman | hen gelen nemun thayinchen chi
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥
pari atan majhi parisavi vinanti | rakhumaichya pati panduranga
परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥
pari to ahe krupecha sagar | tonvari antar padon nedi
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥
parimal mhanuni cholun naye phul | khaun naye mul avadaten
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
parimalen kashtha tajavan tulavilen | anik nanvanchin thodin | ek ten kativen ubhavilin dhavalaren ekachiya kud medi | ek dinarup aniti meliya | ek te bandhoni madi avaghiyan bajar ek chi jala | mivikalin apulya padin
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
paris kay dhatu sone na karitu | phedito nibhrantu lohapangu
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
parisache angen sonen jala vila | vakanen ya kala hin nevhe
परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥
parisen ge sunebai | nako vechun dudh dahin
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥ आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥
parisen vo mate majhi vinavani | mastak charanin thevitasen
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥
parisoni uttar | jab deije satvar
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥
palale te bhyad | tyansi yethen jhala nad
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें झाला नाड ॥१॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥
pavitra ten anna | harichintanin bhojan
पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन ॥१॥ येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥
pavitra ten kul pavan to desh
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
pavitra to deh vani punyavant | jo vade achyut sarva kal
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
pavitra vhavaya ghalin lolani | thevin charanin mastak hen
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥
pavitra sudin uttam divas dasara | sampadala to sadha aji muhurta bara
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जेजेकार हरी हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥
pavitra sonvalin | ek tin cha bhumandalin
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
pavitra hoin charitrauchcharen | rupachya adharen gojiriya
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
pashu aise hoti dnyani | charvanin vishayanche
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे ॥१॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥
pasaruni rahilon baho | soyi aho tumachiye
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥