भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं

parimalen kashtha tajavan tulavilen | anik nanvanchin thodin | ek ten kativen ubhavilin dhavalaren ekachiya kud medi | ek dinarup aniti meliya | ek te bandhoni madi avaghiyan bajar ek chi jala | mivikalin apulya padin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥ एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥ एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥