भजनी मालिका
← भजनांकडे परत

परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा

pari atan majhi parisavi vinanti | rakhumaichya pati panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥ तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥