भजनी मालिका
← भजनांकडे परत

परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी

pari to ahe krupecha sagar | tonvari antar padon nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥ सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥ बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥ तुका म्हणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥