भजनी मालिका
← भजनांकडे परत

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि

paraviya nari rakhumaisaman | hen gelen nemun thayinchen chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ॥३॥