भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिलें त्याची खूण सारू ऐका ॥१॥ अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवतां आदित्य रोहिणीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे बापाचे निधनें वडिवार बोलसी । ते तूं घेवोनि आलासी उजागरपणें ॥१॥ उगलाची देईं लावूं नको दावा । केशवासी ठावा आहे तुझा जीवभाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम ॥१॥ व्यक्ति येणें घडे त्याची या आवडी । युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥ देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे मनींज ऐसें होतें आतां देवा । भाव समर्पावा तुझे चरणीं ॥१॥ तंव मायामोहें मजसी केला हेवा । लोटियेलें भवजळामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही ॥१॥ पक्षी अवचित अंगणांत आला । घेऊनियां गेला सारा तेणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥ सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जागावें हें कोणें । जाणोनी भो-गणें कोणें स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥ तूंची माझ प्राण तूं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता पिता बंधु कुळगुरु दैवत । सखा सर्व गोत केशिराजा ॥१॥ जन्मोनि पोसणा तुझा मी अंकिला । आणिकांचा पांगिला न करीं देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ०॥ बापा यावें भेटावें विसांवा माझा गा तूं । माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठल तूं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

माता म्हणे नामा राऊळाशीं खेळतां । तुज कोण्या दैवता ओढियलें ॥१॥ लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें । हांसती पिशुनें देशोदेशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें ॥१॥ ऐसें मज पाहतां हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचें गुंतलें असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं ॥१॥ कृपा करुनी यावें तुम्ही आश्रमासी । सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग ॥१॥ गोरोबाची कांता पाणियासी जातां । पुत्राला पाहतां खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव