भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला

majhya bovadiya bola | chitta dyaven va viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला ॥१॥ वारा जाय भलत्या ठायां । तैसी माझी रागछाया ॥२॥ गातां येईल तेणेंचि गावें । येरीं हरि हरि म्हणावें ॥३॥ तान मान नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥