भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे बापाचे निधनें वडिवार बोलसी । ते तूं घेवोनि आलासी उजागरपणें

majhe bapache nidhanen vadivar bolasi | te tun ghevoni alasi ujagarapanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे बापाचे निधनें वडिवार बोलसी । ते तूं घेवोनि आलासी उजागरपणें ॥१॥ उगलाची देईं लावूं नको दावा । केशवासी ठावा आहे तुझा जीवभाव ॥२॥ सरता पुरता आमुचेनि झालासी । तें तूं आणिका सांगसी कोण्या तोंडे ॥३॥ सांगतां बहुत होईल पैं व्याजें । मग सोई मज तुज लाविती कां ॥४॥ ते म्हणती ऋणबोडा हा ठायींचा । अहो यासी बोला वाचा बुद्धिवंती ॥५॥ तूं नामयाच्या विठया धीर आणि चतुर । तुजसी खेचर काय बोलिला ॥६॥