भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिलें त्याची खूण सारू ऐका

majhen janmapatra babaji brahmanen | lihilen tyachi khun saru aika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझें जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणें । लिहिलें त्याची खूण सारू ऐका ॥१॥ अधिक ब्याण्णव गणित अकराशतें । उगवतां आदित्य रोहिणीसी ॥२॥ शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्छर शालिवाहन शके ॥३॥ प्रसवली माताअ मज मळ्मूत्रीं । तेव्हां जिव्हेवरी लिहिलें देवें ॥४॥ शत कोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाम मंत्र खुणा वाचुनी पाहे ॥५॥ ऐशीं वर्षें आयुष्य पत्रिका प्रमाण । नामसंकीर्तन नामया वृद्धी ॥६॥