भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही

majhen sarva bhagya keshavache pay | anik upay nenon amhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही ॥१॥ पक्षी अवचित अंगणांत आला । घेऊनियां गेला सारा तेणें ॥२॥ हाटकरी आम्ही हाटसी पैं गेलों । फिरोनियां आलों गांवामाजीं ॥३॥ नामा म्हणे नमूं सर्व जीवजंत । दिसे ते अनंत दृष्टीपुढें ॥४॥