भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं

matapita gharin aheti samasten | vartaman tayaten shrut karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं ॥१॥ कृपा करुनी यावें तुम्ही आश्रमासी । सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥ नेऊनी आश्रमा दिधलें आसन । केलें श्रुत वर्तमान सिदोपंतीं ॥३॥ अर्घ्यपाद्यपूजा भोजन सारिलें । मग वर्तमान पुसिलें सिदोपंतीं ॥४॥ श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव । तंव येथें हा अभिप्राव जाला ऐसा ॥५॥ आतां फिरोनियां जाणें वाराणसी । घेऊनी रखुमाईसी तुम्ही यावें ॥६॥