भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा

majhe manorath purna kije deva | keshava madhava narayana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥ अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥ नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥