भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

धरा सतराचा हो मेळा कारखाना झाला गोळा वाजविती आपुल्या कळा। प्रेमबळा आनंदें ।।१।। झडतोनामाचाचौघडाब्रह्मीब्रह्मरूपीचाहुडासंतऐकतातीकोडांप्रेमबळाआनंदे||२||

रचनाकार: संत जनाबाई

नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख ।। १ ।। लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवी पावती केशवातें ||२||

रचनाकार: संत जनाबाई

नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरूचें पायीं । कापूर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाहीं ॥१॥ साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा। निवर बायको प्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी ।।१।। धन्य माझा जन्म धन्य माझा वंश | धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई