भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी ।। १ ।। माया महत्तत्त्वाचें सुभर तीन पांचाचा प्रकार। पुढें पंचविसांचा भार। गणति केली छत्तीसी ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

बांधोनियां हात गयावळ मारिती। दंड ते करिती मोक्षासाठीं ।।१।। गेले ते पितर मोक्षालागीं तुझे। आतां देई माझे दक्षिणेसी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

भक्त जें जें कर्म करिती। तें तू होसी कृपामूर्ती ।।१।। हैं तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ||२||

रचनाकार: संत जनाबाई

भक्ति ते कठीण इंगळाची खाई। रिपर्णे त्या डोहीं कठीण असे ।।१।। भक्ति ते कठीण विषग्रास घेणें उदास में होणें जीवें भावें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

भ्रांति माझें मन प्रपंची गुंतलें श्रवण मनन होऊनी ठेलें ।।१।। बायें बोधिलें बायें बोधिली। बोधुनी कैसी तद्रूप झाली ||२||

रचनाकार: संत जनाबाई