भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरूचें पायीं । कापूर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाहीं

naval vartalen naval vartalen naval guruchen payin | kapur jaluni gela tethe kajali urali nahin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरूचें पायीं । कापूर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाहीं ॥१॥ साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा। निवर बायको प्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥ नवल वर्तलें नवल वर्तलें नवल चोजवेना डोहामाजीं मासोळीनें वांचविलें जीवना ॥३॥ नवल वर्तलें नवल वर्तलें अनाम चक्रपाणी गोकुळ चोरून नेलें तेथे कैचि दासी जनी ||४||