भजनी मालिका
← भजनांकडे परत

धुणे घेऊनि कांखेसी जनी गेली उपवासी

dhune gheuni kankhesi jani geli upavasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धुणे घेऊनि कांखेसी जनी गेली उपवासी ॥१॥ मार्गे विठ्ठल धांवला म्हणे कां टाकिलें मला ।। २ ।। कां गा धांवोनि आलासी जाय जाय राउळासी ॥३॥ चहूं हातें धुणें केलें जनी म्हणे बरें झालें ॥४॥