भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी राजा आदला बहनी

nana vajantryanchya dhvani raja adala bahani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी राजा आदला बहनी ।।१।। राव प्रवेशला बनीं। अवधी श्वापदे मारुनी ॥२॥ आश्रमी आणावासी राव। केलें ऋषीनें लाघव||३|| मृग कनकाचा साजरा आला रायाच्या सामोरा ||४|| गुणी लाविलासे बाण घेऊं पाहे त्याचा प्राण ||५|| येरु कीलान मारुनी जाय। धरणीं न देवी तो पाय ।।६।। राव लागे तथा पाठीं दम न समाये पोटीं ||७|| प्रवेशला तये वनीं। देखे अपूर्व नयनीं ॥८॥ धेनुव्याघ्र एके स्थानी। चाटी एकमेकां दोन्ही ।। ९।। निर्वैर श्वापदगण राव विस्मय करी देखोन ।।१०।। पुढे जातां सुगंध पाणी राव स्नान करूनी।।११।। भायें जिला गिरिजावर नमन केलें जोडुनी कर ||१२|| विश्वामित्रे तथा वनीं दोघी रूपसा नयनीं । ।१३।। रायापुढे नृत्य करी दाळ विणा झणत्कारीं ।। १४ । द्रव्य आणविलें अपारें । राव देतो आपुल्या करें ।। १५ ।। नाहीं द्रव्यासी कारण तुझ्या स्वरूपासी लीन।। १६ ।। बोले मुनिवर्य दासी राजा कोपला मानसीं ।। १७।। आज्ञा केली प्रधानासी। मारा बाहेर घाला याशी ।। १८ ।। रक्तवदन आश्रमासी म्हणे नामवाची दासी ।। १९।।