भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरिला पंढरीचा चोर गळां बांधोनियां दोर

dharila pandharicha chor galan bandhoniyan dor

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धरिला पंढरीचा चोर गळां बांधोनियां दोर ॥१॥ हृदय बंदिखाना केला आंत विठ्ठल कोंडिला ||२॥ शब्द केली जवाजुडी विठ्ठल पायीं घातली बेडी ||३|| सोहं शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला ||४|| जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥