भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥ द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा ॥१॥ तो़चि महाराज चंद्रभागेतटीं । उभा राहिलासे कर ठेऊनि कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥ द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥ प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा ॥१॥ गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥ मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथें वास करी विश्वनाथ ॥१॥ तयाच्या दर्शनें प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती पायां लागताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ