भजनी मालिका
← भजनांकडे परत

धनलोभ्याचें जाय धन । शोधितसे रात्रंदिन

dhanalobhyachen jay dhan | shodhitase ratrandin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धनलोभ्याचें जाय धन । शोधितसे रात्रंदिन ॥१॥ त्याची निंदा करतील लोक । रांडा पोरें थुंकती देख ॥२॥ भिकेलागीं जेथें गेला । म्हणती काळतोंडी आला ॥३॥ हाता धनलोभें भुलला । संचित ते बरा नागविला ॥४॥ ऐसें धनाचें कारण । शरण एका जनार्दन ॥५॥