भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें

dvarakehuni dhanvanen | kelen pundalikakaranen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । उभा विटेश्यामसुंदर ॥२॥ न बोले म्हणोनि पाहे पुढें । चित्त ठेविलें तिकडे ॥३॥ एका म्हणे जनार्दनीं । धन्य पुंडलिक मुनी ॥४॥