भजनी मालिका
← भजनांकडे परत

धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा

dhanadaraputra apatyen mhanasi majhen | parin he kalachen khajen bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा ॥१॥ गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥ तैसा याचा विश्वास न धरीं तूं; मनीं । यमाची जांचणी तुजसी होय ॥३॥ एका जनार्दनीं सोडोनि देई संग । नाम तूं अभंग हरीचे वदे ॥४॥