भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी

dvarakehuni jagajethi | ala pundalikache bheti | paulen saral gomati | bal suryapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥ पाहतां पुंडलिकांचें वदन । वेडावलें भक्तांचे भुषण । केलेंसे खेवण । समचरणीं विटेवरीं ॥३॥ न बैसे अद्यापि खालीं । ऐशी कॄपेची माउली । एका जनार्दनीं आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥