भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन कामासाठीं देख । न मनीं दोष महा दोषी

dhan kamasathin dekh | na manin dosh maha doshi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन कामासाठीं देख । न मनीं दोष महा दोषी ॥१॥ कवडीये लोभें केला असे मूर्ख । नाठवेची नरक पतितासी ॥२॥ कवडी येकु लाभू होतां । तै श्राद्ध करी मातापिता ॥३॥ मी उत्तम पैलहीन । ही धनलोभ्या नाठवे आठवण ॥४॥ एका जनार्दनीं शरण । काय तया ब्रह्माज्ञान ॥५॥