भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो

dravyachiye ashe kari jo katha | chandal tattvatan janava to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥ द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥ द्रव्याचिये आशे पुराण सांगती । सकुल ते जाती नरकामध्यें ॥३॥ द्रव्याचियें आशें कथेचा विकारा । प्रत्यक्ष तो खरा मातंगची ॥४॥ एका जनार्दनीं नैराश्य भजन । तो प्राणी उत्तम कलियुगीं ॥५॥