भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें ॥१॥ सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥ तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तेजाचें तेजस रुपाचें रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥ पाहतां चित्त निवे मनाचें उन्मन । तें समचरण विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥ देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तेहतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका बंदीखान बंदिमोचन रामचिंतन देव करिती ध्यान । अंत गती सीता सती चोरुनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार वीरचालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

तोंडभरी विवेक मनीं वाहे अभिलाख । विवेक केला रंक विषयाचा ॥१॥ वैराग्याविण ज्ञान बोलती तें उणें । घरोघरीं पोसणें लाविताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ॥१॥ शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥ घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वायां जाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥ वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥ सोपें सोपेंक जपा आधीं रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥ दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥ कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥ पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥ परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥ पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ