भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥ ठेवा माथां हात वंदुं पायवाणी । आणिक दुजें मनीं नाहें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥ हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहु वाचें । तुझें तुज हिताचें । वर्म आम्हीं सांगूं ॥१॥ होई सावध झडकरी । नको पडुं आणिके भरीं । वायांची धांवसी दिशाभरी । श्रमूं निर्धारीं तुजची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ