भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या

tumhasanthi unepan | svayen majalagun yeun dya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥ घेउनी हातीं सुदर्शन । आलें विघ्न निवारी ॥३॥ दारवंटा राखीन तुमचा । एका जनार्दनीं साचा ब्रीद माझें ॥४॥