भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी

tumhin krupaluji deva | kelin seva avadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी ॥१॥ करुनी सडा समार्जन । पाळिलें वचन प्रमाण ॥२॥ उगाळुनि गंध पुरविलें । सोहोअळे केले दासाचे ॥३॥ ऐसा अपराधी पतीत । एका जनार्दनीं म्हणत ॥४॥