भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशी पाहतां आपोआप । सहज जाय पापताप

tulashi pahatan apoap | sahaj jay papatap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुळशी पाहतां आपोआप । सहज जाय पापताप ॥१॥ तुळशी सेवा रे जननी । जे पढिये जनार्दनीं ॥२॥ करितां प्रदक्षणा मनें । भवरोगा उपशमन ॥३॥ मुळीं निक्षेपितां जळ । कळिकाळा सुटे पळ ॥४॥ जिचे लागतां सिंतोडे । कर्माकर्म समूळ उडे ॥५॥ भावें करितां पूजन । भगवंती होय समाधान ॥६॥ मुळी मृत्तिका कपाळीं । जन्ममरणा होय होळी ॥७॥ सेवी एका जनार्दन । तुळशी सबाह्य हरी पूर्ण ॥८॥